👁 5 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर: प्रतिनिधी

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यादरम्यान प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. समाधान माळी आदींच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सिंहगड कॉलेज मध्ये स्पर्धा परीक्षा निमित्त क्युज कॉम्पिटिशन घेण्यात आली. यामध्ये  प्रथम क्रमांक बालाजी गजानन पवार व द्वितीय क्रमांक धनराज डांगे यांना प्राप्त केला. विजयी स्पर्धेकांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान केला.  ही स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रा. अभिजित सवासे व त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विनायक ऐवळे, देविदास शिंदे, नागेंद्रकुमार नायकुडे, साईआनंद धट, अशोक कदम, साक्षी जावीर, सरिता कुंभार, पुनम शिंदे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले. यादरम्यान नवनाथ माळी, संजय बनकर, पांडूरंग परचंडे, योगेश नवलेल. प्रभाकर शिंदे, संतोष भुजबळ, दत्तात्रय पवार, जयप्रकाश जाधव आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *