👁 7 Views

सोलापूर- नव्वद वर्षाचे आजोबा, एक वर्षाचे बाळ झाले कोरोनामुक्त

कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांची माहिती 
           सोलापूर दि. 8 : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना विलीगीकरण कक्षातून आतापर्यंत 29 रुग्णांना कोरोनामुक्त करुन घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये नव्वद वर्षाचे गृहस्थही होते तर एक एक वर्षाचे बाळही होते, अशी माहिती औषध वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख तसेच कोरोना कक्ष प्रमुख डॉ. एच.व्ही. प्रसाद यांनी दिली आहे.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


           डॉ. प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना विलीगीकरण कक्षात एकूण 103 रुग्ण भरती झाले होते. त्यातील 29 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या 29 जणांत एक रुग्ण तब्बल 90 वर्षाचे होते तर एक रुग्ण केवळ एक वर्षाचे बाळ होते. मेडिकल कॉलेजच्या पथकाने त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त केले आहे. एका रुग्णास न्युमोनिया होता, तसेच मुत्रपिंडाचा आजारही होता. त्यांच्यावर कोव्हिड आयसीयू मध्येच डायालिसिस करण्यात आले. त्यांच्या न्यूमोनियाही बरा झाला.
           उर्वरित 26 रुग्णांपैकी सात लोकांना न्युमोनिया होता. पाच लोकांना घसा दुखीचा त्रास होता. उर्वरित 14 लोकांना कोरोना बाधा झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र यांना रक्तदाब, दमा, मधुमेह आणि ह्दयविकार आदी त्रास होते. मात्र त्यांच्यावर उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले.
विलीगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 26 रुग्णांना न्यूमोनिया, 28 रुग्णांना घसादुखीचा त्रास होता म्हणून खोकला, ताप अथवा दम लागल्यास रुग्णालयांत तात्काळ येणे गरजेचे आहे. मृत झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश 55 वर्षापेक्षा जास्त आहेत. म्हणून ज्येष्ठ नागरिकांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रसाद यांनी सांगितले.
00000
मूळ गावी जाण्यासाठी
मदत केली जाणार
आदिवासी प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा
सोलापूर दि. 8 :  अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) ज्या व्यक्ती सोलापुरात नोकरीच्या निमित्ताने अथवा शिक्षणासाठी इतर जिल्ह्यातून स्थलांतरित झालेल्या आहेत, अशा व्यक्तींना त्यांच्या मूळच्या जिल्ह्यात जाण्यास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, सोलापूर यांच्यामार्फत मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रकल्प अधिकारी, जागृती कुमरे यांनी दिली आहे.
संबंधित व्यक्तींनी पुढील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा – जागृती कुमरे, प्रकल्प अधिकारी (9420589226), पल्लवी शेळके, सहा. प्रकल्प अधिकारी (9420488882) आणि महादेव बनसोडे, प्रभारी सहा. प्रकल्प अधिकारी (8087706103) किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, प्लॉट नंबर -2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्किटेक्चर कॉलेज जवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर दूरध्वनी क्रमांक 0217-260600, येथे संपर्क साधावा.  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *