👁 12 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये ऑनलाईन नामवंत कंपनीचे वेबिनार मालिका आयोजन

पंढरपूर (प्रतिनिधी)

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी १५ मे २०२० पासून विविध नामवंत कंपनीचे एचआर, एमडी,ऑनलाईन वेबिनार कार्यशाळा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी  याचाच भाग, वेबशार या अमेरिकन कंपनीच्या नामवंत तज्ञांचे विशेष मार्गदर्शनाचे वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART



या वेबिनार मध्ये अत्यंत व्यावसायिक आणि उद्योजक तज्ञांकडून ऑनलाईन झूम, वेबएक्स अँप वर आधारित वेबिनारांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. हे वेबिनार विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यासाठी, नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी, आगामी कॅम्पस ड्राईव्हची पूर्वतयारी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार असुन जगातील नामांकित कंपन्या मध्ये नोकरी तसेच शासकीय नोकरी मिळविण्यासाठी फायदा होणार असुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे वेबिनार महत्वपूर्ण ठरणार आहे.

सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्रशासनाच्या वतीने संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत ग्रामिण व शहरी भागातील इंजिनिअरींग काॅलेज ला सुट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन तसेच सुट्टीच्या कालावधीतील वेळ वाया जाऊ नये यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने घरी बसुन ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समिर कटेकर यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *