👁 19 Views

पंढरीतील प्राणघातक हल्ला झालेल्या ‘त्या’ तरूणाचा मृत्यू



पंढरपूर लाईव्ह- 10 मे रोजी दुपारी पंढरपूर मध्ये अज्ञात आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती, या हल्ल्यातील गंभीर जखमी तरूणाचा आज पहाटे मृत्यू झाला आहे. 


पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार  दि. 10-5-2020 रोजी दुपारी 12:30 वाजणेपूर्वी शंकर दत्तु शिंदे (वय 44), रा. सुलेमान चाळ, पंढरपूर  या तरूणावर अज्ञात आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद राजु दत्तु शिंदे (जखमी तरूणाचा भाऊ) यानी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिली होती. 


गंभीर जखमी झालेल्या या तरूणावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार  सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा आज पहाटे मृत्यू झाला आहे.  

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

आरोपीनी उमा कॉलेजच्या पाठीमागे,  12 नंबर शाळेजवळील शौचालयाचे बाथरूममध्ये  शिंदे यास त्याचे डोक्यात, छातीवर सिमेंट काँक्रीटच्या दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये शिंदे हे जबर जखमी झाले होते. 

याबाबतच्या गुन्ह्याची नोंद पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये झाली होती. अज्ञात आरोपीच्या विरूध्द भादवि 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आता या गुन्ह्यातील आरोपीविरुध्द भादवि 302 यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *