सरकोली ता पंढरपूर येथील संतोष सुरेश कपणे (वय 36) हा दूधव्यवसाय ( गवळी) करीत होता. गुरुवारी संध्याकाळी जेवण करून आपल्या घरासमोरील कट्ट्यावर (रस्त्यावर) झोपला होता. दिवसभर काम करून कंटाळा आल्याने गाढ झोपला असताना मध्यरात्री एक ते दोन च्या दरम्यान दारात झोपलेल्या संतोष च्या डोक्यात अज्ञात व्यक्तीने दगड घालून पसार झाला.

दररोज पहाटे चार वाजता उठणारा संतोष अजूनही उठला नाही म्हणून त्याची आई उठवण्यास गेली तेव्हा संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. समोरचे चित्र पाहून आई ओरडली असता घरातील व शेजारील लोक गोळा झाले आणखी जीव असेल या आशेने त्यास उपचारासाठी पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे नेण्यात आले; परंतु डॉक्टरने पाहताक्षणी मयत झाल्याचे घोषित केले व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. सदर गुन्ह्याची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असुन पोलीसांनी जागेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरराव ओलेकर करीत आहे.

