👁 8 Views

बीड जिल्हा – हाळंब, कारेगांव व बारगजवाडी येथे कन्टेनमेंट झोन घोषित पूर्णवेळ संचारबंदी लागू-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Pandharpur Live – 
बीड, दि.27:- हाळंब येथे 2, कारेगांव येथे 1 व बारगजवाडी येथे 2 कोरोना विषाणूचे लागण (COVID-19 Positive) झालेले  रुग्ण आढळून आले आहे, त्यामुळे संबंधित क्षेत्रात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत .
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART


   याबाबत अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी,बीड यांनी सादर केला आहे. त्यामुळे जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परळी वै. तालूक्यातील हाळंब या गावापासून 3 कि.मी. परिसरातील हाळंब,हेळंब,खोडवा सावरगांव, भोजनकवाडी, दैठणाघाट व खोडवा सावरगांवतांडा  तसेच पाटोदा तालूक्यातील कारेगांव या गावापासून 3 कि.मी. परिसरातील  कारेगांव, कारेगांव भोसलेवस्ती, कठाळवाडी, जन्नेवाडी, नाळवंडी त्यालगतचा शिरुर का. तालूक्यातील उखळवाडी, मोरजळवाडी व येवलवाडीनाथ (जानपीर) आणि शिरुर कासार तालूक्यातील बारगजवाडी या गावापासून 3 कि.मी. परिसरातील बारगजवाडी,बडेवाडी, शेरेवाडी व उंबरमुळी हा परिसर कन्टेनमेंट झोन (उेपींरळपाशपीं ूेपश) म्हणून घोषित करण्यात आला आहे. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचार बंदी लागू करण्यात आली आहे .
  
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी 31 में 2020 पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक 31 में 2020 रोजीचे रात्री 12.00 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *