👁 11 Views

सोलापूर- सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत हॉस्पिटल सुरु ‘आयएमए’कडून रुग्णालयांची यादी आणि हेल्पलाईन क्रमांक जाहिर

Pandharpur Live – 

­              सोलापूर, दि. 28- शहरातील नॉन कोविड रुग्णालयांची यादी आणि रुग्णालयाचे हेल्पलाइन क्रमांक इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर करण्यात आले.  सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत सर्व हॉस्पिटल सुरु असुन या वेळेत अपत्कालीन रुग्णांना स्वीकारले जाईल, असे आयएमएने जिल्हा प्रशासनास कळविले आहे.
                       शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयएमएच्या प्रतिनिधींना दवाखाने सुरु ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या. सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय व दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयएमएकडून शहरातील रुग्णालयांची यादी व हेल्पलाइन क्रमांक जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर आणि सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी यादी सादर केली आहे. सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत सर्व हॉस्पिटल सुरु असुन या वेळेत अपत्कालीन रुग्णांना स्वीकारले जाईल. नियमित रुग्णांसाठी बाह्यरुग्णसेवा देण्यासाठी हॉस्पिटल क्लिनिक सुरु आहेत असे आयएमए चे अध्यक्ष डॉ. हरिश रायचुर आणि सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे डॉ. सुदीप सारडा यांनी कळविले आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-

DVP MART

हॉस्पिटलची नावे आणि हेल्पलाईन क्रमांक
सर्व स्पेशालिटी:
*अश्विनी हॉस्पिटल- 0217-2319900/5, 
संपर्क व्यक्ती: 9552555041
* मार्कंडेय सहकारी रुग्णालय- 0217- 2452018
* यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- 0217-2323001/2
अस्थिरोगतज्ञ:
* कोठाडिया नर्सिंग होम- 9689999711,
* शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057
* येमुल ऑर्थोपेडिक सेंटर- 9172836652/ 3550006
* मोनार्क हॉस्पिटल- 7721800018
न्यूरोलॉजी:
* एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स- 
9823714872/ 9175988840
* सी एन एस हॉस्पिटल- 0217-2728877/ 9322088000
बालरोगतज्ञ:
* स्पॅन हॉस्पिटल- 0217-2728033
* चिरायू मुलांचे हॉस्पिटल- 0217-2620800
* शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057
  सौ जनाई मेमोरियल आशिश क्लिनिक 0217-2627447
* जनरल सर्जरी: मोनार्क हॉस्पिटल- 7721800018
ह्दय रोग तज्ञ – अपेक्स हॉस्पिटल-0217-2600602/2600603,
9545277222
स्त्रीरोगतज्ञ
जिथे नोंद झाली आहे अशा स्त्रीरोगतज्ञाकडे संपर्क साधावा. नोंद झाली नसल्यास अश्विनी ग्रामीण रुग्णालय व मेडिकल कॉलेज येथे 9849633578/ 9423869563 येथे संपर्क साधावा.



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *