Pandharpur Live – संपुर्णपणे कोरोनामुक्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात एका पॉझिटीव्ह रूग्णापासुन झालेली बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला एकूण कोरोना बाधितांची संख्या 822 एवढी झाली असुन आजपर्यंत 72 जणांचा मृत्यू झालाय. कोरोना बाधीत रुग्णांचा सोलापूर जिल्ह्यात सध्या चढता आलेख आढळून येत आहे.
सोलापूर शहरापुरती मर्यादित असलेली कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्यातील इतर भागात सुध्दा वाढताना दिसत आहे. बाहेरगावाहून जिल्ह्यात आलेल्या लोकांना प्रशासनाने तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. अन्यथा कोरोना विषाणुला जिल्ह्यात हातपाय पसरविण्यापासुन रोखणं महाकठीण काम होऊन बसणार हे नक्कीच.
आजचा सोलापूर जिल्ह्याचा अहवाल-
दि.29/05/20 सकाळी 8.00
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

आजचे तपासणी अहवाल – 166
पॉझिटिव्ह- 74 (पु. 60 * स्त्रि- 14 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 0
एकुण पॉझिटिव्ह- 822
एकुण निगेटिव्ह – 5772
एकुण चाचणी- 6594
एकुण मृत्यू- 72
एकुण बरे रूग्ण- 321
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-
DVP MART
रुग्णसंख्या अशीच वाढली तर समुदाय प्रसाराचा (कम्युनिटी स्प्रेडिंग) धोका आहे. कोरोनाचा समुदाय प्रसार रोखण्याचे आता खरे आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रशासन व लोकांची दक्षता अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.
मुंबई, पुणे, ठाणे अशा कोरोना ‘हॉटस्पॉट’ झोनमधून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. नवीन रुग्णांचे संसर्गाचे कनेक्शन हमखास मुंबई हेच येत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. बाहेरून येणार्या व्यक्तींना जिल्ह्यात न घेणे हे चुकीचे होईल. बाहेरून येणार्या भुमीपुत्रांना जिल्ह्यात घ्यावे लागेल. पण इथे मूळ गावी आल्यानंतर त्यांना कम्युनिटी क्वारंटाईन करणे गरजेचे बनले आहे.
‘होम क्वारंटाईन’ची संकल्पना घरामध्ये प्रभावीपणे राबविण्यात अनेक मर्यादा, अडचणी आहेत. ‘कोरोना’चा समुदाय प्रसार रोखायचा असेल तर गावाजवळ ‘कम्युनिटी क्वारंटाईन’ अथवा संस्थात्मक क्वारंटाईन हा प्रभावी उपाय आहेत. त्याला बाहेरून येणार्या व्यक्तींनीही सहकार्य करणे आवश्यक आहे.
पंढरपूरमधील प्रस्तावित कोव्हिड हॉस्पिटल आणि राजकारण…
पंढरपुरात कोविड-१९ रूग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच येथील स्थानिक राजकीय नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर कोविड रूग्णालयाचा प्रश्न अजून ही लटकला आहे. दरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतानाही येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बोटचेपे धोरण असल्याने या बाबतचा गुंता अधिकच वाढला आहे.
संकटाच्या काळात राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आरोग्य सेवा निर्माण करण्यास विरोध करणे म्हणजे समाजाशी आणि सामाजिक बांधिलकेशी प्रतारणा करण्या सारखेच आहे. कोविड रूग्णालय सुरू करण्यावरून पंढरपुरात सध्या सुरू असलेल्या राजकीय धुळवडीमध्ये सर्वसामान्य रूग्णांची मात्र हेळसांड सुरू आहे.
कोरोनाच्या या गंभीर प्रश्नावरून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी उठ सूठ कोणीही विरोध करेल आणि प्रशासन त्याकडे पाहत बसणार असेल तर पंढरपूरकरांसाठी हे धोक्याचे ठरणारे आहे. एकंदरीतच अशा गंभीर परिस्थितीत शासनाकडून आलेले आदेश आणि लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन कायद्याचा आधार घेत समन्वय राखणे गरजेचे आहे.
येथील उपजिल्हाधिकारी सचिन ढोले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ सागर कवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून केवळ दिखाव्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशीच मागणी पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.