👁 10 Views

सुखद… पंढरपूर तालुक्यातील सर्व 47 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह



Pandharpur Live- कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या, व बाहेरगावाहून आलेल्या, क्वारंटाईन केलेल्या पंढरपूर तालुक्यातील  ४७ जणांचे रिपोर्ट आज निगेटीव्ह आल्याची सुखद माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. पंढरपूर , गोपाळपूर,उपरी ,चळे, कासेगाव व कॉटेज हॉस्पिटल येथील  47 जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये पंढरपूर येथील समता नगर येथील व्यक्तीचाही समावेश आहे.     


तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी  पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था आहोरात्र झटत आहे. तालुक्यात बाहेरुन  आलेल्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण  बंधनकारक करण्यात आले आहे.  या नागरीकांनी स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी जबाबदारीने  रहावे. सर्वच नागरीकांनी आपल्या 65 वर्षावरील व्यक्ती आणि 10 वर्षाखालील मुलांची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही प्रांताधिकारी ढोले यांनी यावेळी केले आहे.  



Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!


Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप-
DVP MART
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यापासुन तालुक्यातील जनतेत भीतीचे वातावरण आहे. शहर व तालुक्यातील ज्या भागातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल केलेले आहे त्या भागातील रहिवाशी या सर्वांचे रिपोर्ट येईपर्यंत भीतीच्या सावटाखाली असलेले आढळून येत आहेत.

दरम्यान आज एकुण 47 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु शहर व तालुक्यातील जनतेने काळजी घ्यावी, कामाशिवाय घराबाहेर पडू नये.  असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील त्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांबाबत…

                     पंढरपूर तालुक्यात आढळुन आलेल्या एकूण 6 रुग्ण पैकी 2 रुग्ण (पहिला उपरी व दुसरा गोपाळपूर मधील) यांच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. उर्वरित 4 रुग्णांवर कोविड केअर सेंटर, वाखरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी यांचे निगराणी मध्ये उपचार चालू आहेत. सर्वांची प्रकृती सद्यस्थितीत चांगली आहे. अशी माहिती आरोग्यअधिकारी डॉ. बोधले यांनी दिली आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *