Pandharpur Live-
○ भारता सह परदेशातील ७५० हून अधिक प्राध्यापकांचा सहभाग
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात दि. २३ मे २७ मे या कालावधीत प्राध्यापकांचे कौशल्य विकसित करण्यासाठी “ऍडव्हान्स्ड ऑप्टीमायझेशन टूल्स अँड टेकनिक्स फाॅर रिसर्चर्स् अँड इंजिनिअर्स” या प्रोगॅमचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
Adv. घरबसल्या किराणा माल खरेदीसाठी डीव्हीपी मॉलचे अॅन्ड्रॉईड अॅप-
DVP MART
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय व पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रोगॅम मध्ये भारतासह परदेशातील ७५० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये सहभागी प्राध्यापकांना ऑनलाईन लेक्चरचे व्हिडिओ पाहणे, क्वीझ सोडविणे, कोर्स मधील टास्क अपलोड करणं बंधनकारक होते.
या कार्यक्रमासाठी सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे येथील डाॅ. राजेंद्र काटीकर, आयआयटी वाराणसी येथील डाॅ. अजिंक्य टंकसाळे, पुणे येथील इंपेरियल काॅलेजचे डाॅ. सारंग जोशी, सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रा. अतुल सुरवसे,पुणे येथील व्ही.आय.आय.टी. मधील डॉ. लक्ष्मी बेवूर आदी सह इतर नामांकित तज्ञांकडून सहभागी प्राध्यापकांना महत्वापुर्ण मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे संयोजक पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी समन्वयक म्हणून यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. संतोष बनसोडे यांनी काम पाहिले.

