👁 14 Views

पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्यांची एक दिवशीय कार्यशाळा संपन्न


Pandharpur Live- 
    पंढरपूर: प्रतिनिधी  कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयात अंतिम वर्ष व तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

 पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “प्रकल्प अंमलबजावणी आणि तांत्रिक लेखन” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयात तृतीय व अंतिम वर्षामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करीत असताना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रकल्प करण्याची गरज, प्रकल्पाची निवड, प्रकल्पा संदर्भात आवश्यक माहिती, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या साधनांची माहिती, त्याची उपलब्धता, प्रकल्पाचे नियोजन, पूर्ण झालेल्या प्रकल्पातून मिळणारे निष्कर्ष ते मांडण्याची पद्धत, याचबरोबर ते निष्कर्ष योग्य पद्धतीने प्रदर्शन करण्याची पद्धत अशा अनेक मुदुद्यांचा समावेश या कार्यशाळेमध्ये करण्यात आला होता.
   ही कार्यशाळा ई- कार्यशाळा या पद्धतीने घेण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने संशोधन अधिष्ठाता डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम केले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी ३० गुणांची परीक्षा घेण्यात आली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना ई- प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *