👁 14 Views

तिसंगी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मास्कचे वाटप

Pandharpur Live-   
गावातील नागरिकांनी कोरोनाच्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे : गोरख पाटील

तिसंगी,ता,31ःतिसंगी( ता,पंढरपूर) येथिल नागरिकांनी कोरोना विषयी सुचनांचे व आदेशाचे पालन करून आपल्या गावाला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी ग्रामस्तरीय समितीला सहकार्य करावे तसेच गावामध्ये कुणीही विनाकारण फिरून गर्दी करू नये.स्वत:ची काळजी घ्यावी. येणार्‍या काळात आरोग्य विषयी महत्वाच्या सुचनाचे पालन करावे असे अहवान  उपसरपंच गोरख पाटील यांनी केले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 295 वी जयंतीनिमित्त ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून पुष्पहार अर्पण करताना तिसंगी येथे बोलत होते.

   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

यावेळी प्रभात डेअरीचे अध्यक्ष  मल्हारी हेगडे यांनी ग्रामस्तरीय समितीच्या कडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण झाल्यानंतर गावातील नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी भिवा पाटील,बालाजी पाटील,अविनाश बाबर,अनिल रूपनर,बाबासाहेब पाटील,वैभव रूपनर,नागेश रूपनर आदीसह ग्रामस्थ,समाज बांधव सोशल डिस्टन्सचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *