👁 10 Views

सोलापूर,- ‘आयएमए’कडून रुग्णालयांची यादी आणि हेल्पलाईन क्रमांक जाहिर… सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत हॉस्पिटल सुरु


Pandharpur Live-   

            सोलापूर,दि.2-  शहरातील नॉन-कोविड  रुग्णांना सेवा देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशने दवाखान्यांची यादी जिल्हा प्रशासनाला सादर केली आहे. हे दवाखाने सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत सुरु असून आपत्कालीन रुग्णांना स्विकारतील, नियमित रुग्णांसाठी बाहयरुग्णसेवा हॉस्पिटलच्या वेळेनुसार सुरु राहील, असे आयएमएने कळविले आहे.

          

   Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयएमएच्या प्रतिनिधींना दवाखाने सुरु ठेवण्याबाबत सूचना केल्या होत्या. सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय व दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयएमएकडून शहरातील रुग्णालयांची यादी व हेल्पलाइन क्रमांक जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर आणि सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी ही यादी सादर केली आहे.

    रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेत खालील नमूद हॉस्पीटलमध्ये तातडीची रुग्णसेवा मिळेल.

हॉस्पिटलची नावे आणि हेल्पलाईन क्रमांक

सर्व स्पेशालिटी:

* अश्विनी हॉस्पिटल- 0217-2319900/5, संपर्क व्यक्ती: 9552555041

* मार्कंडेय सहकारी रुग्णालय- 0217- 2452018

* यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- 0217-2323001/2

अस्थिरोगतज्ञ:

* कोठाडिया नर्सिंग होम- 9689999711,

* शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057

* येमुल ऑर्थोपेडिक सेंटर- 9172836652/ 3550006

* मोनार्क हॉस्पिटल- 7721800018

* डॉ.चिडगुपकर हॉस्पिटल – 0217-2326841

* शुश्रुत किल्निक – 0217-2318141/0217-2318142

न्यूरोलॉजी:

* एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स- 9823714872/ 9175988840

* सी एन एस हॉस्पिटल- 0217-2728877/ 9322088000

* एस.एस.बलदावा न्यूरोसायन्स्- 9067770015

बालरोगतज्ञ:

* स्पॅन हॉस्पिटल- 0217-2728033

* चिरायू मुलांचे हॉस्पिटल- 0217-2620800

* शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057

* सौ जनाई मेमोरियल आशिष् क्लिनिक 0217-2627447

* जनरल सर्जरी: मोनार्क हॉस्पिटल- 7721800018

ह्दय रोग तज्ञ –

 ॲपेक्स हॉस्पिटल-0217-2600602/2600603,9545277222

स्त्रीरोगतज्ञ

  जिथे नोंद झाली आहे अशा स्त्रीरोगतज्ञाकडे संपर्क साधावा. नोंद झाली नसल्यास अश्विनी ग्रामीण रुग्णालय व मेडिकल कॉलेज येथे पुढील क्रमांकावर 9849633578/ 9423869563 येथे संपर्क साधावा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *