
Pandharpur Live – ll
पंढरपूर.दि.08 : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयाटी कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे तालुक्यातील पाच नागरिक आज कोरोनातून पुर्णपणे बरे झाल्यांनतर त्यांना आज मोठ्या उत्साहात घरी सोडण्यात आले.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
वाखरी येथील एमआयाटी कोरोना केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेल्या पाच जणांना 14 दिवस क्वारंटरईन करण्यात आले होते. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थिातांनी पुष्पवृष्टी करुन हरिनामाच्या जयघोष करीत त्यांना केअर सेंटर मधून घरी पाठविण्यात आले. तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
