👁 8 Views

स्वेरीज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात


Pandharpur Live – 

ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न
पंढरपूर:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाकडून दिनांक १० जून ते १४ जून २०२० या कालावधीमध्ये ऍडव्हान्सेस अँड रिसर्च अपॉर्च्युनिटिज इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ या विषयावर ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम नुकताच संपन्न झाला

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

          जगभरातील वस्तू निर्माण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे गरजेचे असते. येत्या दशकामध्ये वस्तू निर्माण क्षेत्रातील प्रगतीसाठी व त्यामधील संशोधन आणि उपलब्ध संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा विनाशुल्क आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेचे उदघाटन सांगलीच्या कणाद इलेक्ट्रोमेशनचे संस्थापक संजय जोगळेकर यांच्या हस्ते झाले. स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते आणि त्या दृष्टीने स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख कार्यरत असतात. 

या कार्यशाळेत जोगळेकर यांनी एम्बेडेड सिस्टीम आणि भविष्यात एम्बेडेड सिस्टीमचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होऊ शकतो तसेच एम्बेडेड सिस्टिमचा वापर  सध्याच्या मेडिकल फील्ड मध्ये खूप गरजेचा आहे तसेच व्हेंटिलेटर कसे तयार करता येईल यासंदर्भात माहिती दिली. तसेच निताल कॉम्प्युटर सिस्टम्स प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन नातू यांनी इंडस्ट्री ४.० आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज यावर मार्गदर्शन केले. बेंगलोरच्या अप्लाईड मटेरियल प्रा.लि.चे टेक्नीकल लीड डॉ.आकाश गंधमल यांनी इमेज प्रोसेसिंग इन मेडीकल अॅप्लिकेशन आणि मशीन लर्निंग यावर मार्गदर्शन केले. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ. श्रीनिवास महाजन यांनी मायक्रोवेव आणि स्मार्ट अँटेना याबद्धल माहिती दिली. जिओ रिलायन्स लॅबचे उपाध्यक्ष डॉ.मुनीर सय्यद यांनी ब्लॉक चेन टेक्नोलॉजी आणि कम्युनिकेशन यावर माहिती दिली.

अमरावतीच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ.डी.टी.इंगोले यांनी अभियांत्रिकीच्या क्षेत्रात स्टार्टअप कसा करावा’ याची सविस्तर माहिती दिली. सदर ऑनलाईन कार्यशाळा ही पाचही दिवस दररोज सायंकाळी ४.०० ते ६.०० असे दोन तास गुगल मीट ॲप द्वारे व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आली. त्याचबरोबर सहभागींकडून प्रत्येक सत्राच्या संबंधित ऑनलाईन प्रश्नावली देखील सोडवण्यात आल्या. कोरोना सारख्या बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत अनुभवी मान्यवरांमार्फत अतिशय मौल्यवान मार्गदर्शन उपलब्ध केल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक होत आहे. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मिनाक्षी पवारप्रा. महेश मठपतीप्रा.आशिष जाधवप्रा. हुसेन भालदार यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग यांनीही परिश्रम घेतले तर कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. श्रीशैल स्वामी यांनी काम पहिले. या कार्यशाळेमध्ये राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील एकूण ८१० जणांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *