Pandharpur Live –
आज जगभरात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. आजमितीला कोरोनाच्या संकटाला घाबरून कांही पगारी डॉक्टरही काम सोडून जात आहेत. परंतु या संकटाच्या सावटाखाली सुध्दा आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत निरपेक्ष भावनेने माणुसकीचा धर्म पाळणार्या पंढरीतील डॉ. राजश्री सालविठ्ठल, डॉ. वृषाली पाटील, डॉ. पल्लवी पाटील या महिला डॉक्टर कोविड- 19 ला पराभुत करण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून कसलीही सुट्टी न घेता काम करीत आहेत. डॉक्टर महिलांच्या कार्याचम कौतुक होताना आढळत आहे. हा विरोधाभास असला तरी सत्य आहे. माणसाचा माणुसकी हाच मोठा धर्म असल्याचे या सेवेकरी डॉक्टर वरून दिसते. वरचेवर स्थिती गंभीर होत असतानाच हे सेवेकरी सैनिकांसारखे आपल्या जागा लढवून एक आदर्श घालून देत आहेत दुसर्या बाजूला आदर्श बाजूला ठेऊन काहीजण मागे अदृश्य होत आहेत. समाजाचे दैवत ठरलेल्या डॉक्टरांना दानव झाल्याच पाहून समाजदेखील आवाक झाला आहे. आणि यात लढाई देणार्या डॉक्टरांना पाहून तेवढाच अभिमानाने प्रभावित आणि पुलकीत होत आहेत. आज देव पाहायला मिळतो तो याच रूपात परंतु नेवैद्यासाठी पुजारी होणारे देखील आज दिसत आहेत. हे संकट जेव्हा जाईल तेव्हा या पळपुटयांची जागा कोठे असेल? हा येणारा काळच ठरवेल. सेवेकरी आणि मेवेकरी ओळखण्याची हीच खरी वेळ आहे हा लढा जीवांचा जीवनासाठी सुरू आहे हे जीव असून निर्जीव असणार्याला कसा कळावा? स्वार्थालाही अर्थ असावा परंतु अर्थासाठी स्वार्थ कशासाठी?
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
मरण अटळ आहे मग आजचे उद्या करून तरी काय साध्य करणार आहेत ही मंडळी. वास्तविक हा लढा कोविड शी वाटतो आहे परंतु आता तो माणसा माणसात सुरू झालाय सामान्य जन मात्र सेवेकरी डॉक्टरांच्या पाठीमागे नक्की उभे राहतील यात शंका नाही. कठीण समय येता कोण कामास येतो हे आज सामान्य माणसाला कळत आहे. व्यवसायिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन डॉक्टर हा मधला एक वर्ग केवळ सेवाभावाने आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहे. मानवजात टिकवण्याची मुख्य जबाबदारी आज डॉक्टर आहे. जगण्याचा स्वार्थ तर प्रत्येकाला आहेच परंतु यातही नि:स्वार्थी भावाने काम करणारे लोक म्हणजे दैवी अवतारच म्हटले पाहिजेत.
वरील सर्व लिहिण्यामागे कारण आज अशा परिस्थितीत पंढरपूरमधील डॉ. राजश्री सालविठ्ठल, डॉ. वृषाली पाटील, डॉ. पल्लवी पाटील कोविड- 19 ला पराभुत करण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून कसलीही सुट्टी न घेता अविरतपणे काम करीत आहेत.
डॉ. सालविठ्ठल या पंढरपूर न. पा. येथे 10 वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.
आज सद्यस्थितीत या तीन महिला डॉक्टरांनी पंढरपूर मध्ये अडकलेल्या परराज्यातील लोकांना त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना स्वगृही पाठविण्याची मोलाची भूमिका केली आहे. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये संस्थात्मक विलगीकरण आणि गृह विलगीकरणात असणार्या लोकांची दैनंदिन आरोग्य तपासणी केली जात आहे. काही त्रास होत असल्यास त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. यामध्ये बालके, गरोदर स्त्रिया, वृद्ध नागरिक यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
विलागीकरण कक्षातील लोकांचे समुपदेशन करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या 3 महिला डॉक्टर करत आहेत.
त्याचबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, न पा सफाई कामगार , चेक पोस्ट , पोलीस स्टेशन यांचे प्रत्येक आठवड्यातून एकदा थर्मल आणि spo2 ची तपासणी डॉ. वृषाली पाटील करत आहेत. न पा पंढरपूर कडून सुरू करण्यात आलेल्या कम्युनिटी क्लिनिकमध्ये ताप सर्दी खोकला असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम डॉ. सालविठ्ठल आणि डॉ. पल्लवी पाटील यांच्या मार्फत सुरू आहे.
अभिमानाची गोष्ट अशी की MIT वाखरी पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह पेशंट तसेच हाय रिस्क कॉन्टॅक्टड पेशंट यांच्यावर अॅलोपॅथीक, औयुर्वेदीक, होमिओपॅथिक पद्धतीने उपचार सुरू आहेत.
अशा या कोविड केअर सेंटर येथे डॉ. वृषाली पाटील आणि डॉ. पल्लवी पाटील या स्वयंस्फुर्तीने विनामोबदला काम करीत आहेत. त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
अशा या खर्या ‘कोविड योद्धा’ असलेल्या पंढरपूरच्या लेकींच्या कार्याला पंढरपूर लाईव्ह कडून मानाचा मुजरा!

