👁 37 Views

खळबळजनक… पंढरीतील मठात गळफास घेऊन एकाची आत्महत्या


Pandharpur Live –

पंढरीतील एका मठाच्या खोलीत एकाने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक माहिती अशी की, आज सकाळी 8:30 वाजता इसबावी येथील बाळकृष्ण फणसे महाराज मठाच्या एका खोलीत तानाजी ज्ञानोबा कोंडे (वय-60) रा . केळवडे, ता. भोर, जि. पुणे (सध्या रा. फणसे मठ) यानी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याची खबर कोंडीभाऊ महादेव जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.  पोलिसांनी प्रेत ताब्यात घेतले असुन घटनेची नोंद शहर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

अधिक तपास पोलीस हेड काँन्स्टेबल वाघमोडे हे करत आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *