👁 11 Views

चौथ्या स्तंभाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर विनोद पञे यांना विधान परिषदेवर पाठवा…..!


Pandharpur Live –

पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी
यांची राज्यपाल यांच्याकडे मागणी…!

पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक तथा अध्यक्ष विनोद पत्रे यांना राज्यपाल साहेबांनी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे राज्य सचिव अनिल चौधरी यांनी राज्यात सर्व प्रथम राज्यपाल यांच्याकडे ई-मेल द्वारे मागणी केली.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

मा. श्री विनोद पत्रे यांना विधान परिषदेवर संधी दिली तर राज्यातील पत्रकारांच्या समस्या ते सोडवु शकतील. मा. विनोद पत्रे हे पदवीधर पत्रकार असून धाडसी व मनमिळावु वृत्तीचे , त्यांचे राज्यातील ग्रामीण तथा शहरी पत्रकारांशी चांगले संबंध आहे ते पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मागील १० वर्षापासून अहोरात्र झटत असून बऱ्याच वेळेस आंदोलनेसुध्दा केली आहेत. पत्रकारांमधुनच विधान परिषदेवर मा. विनोद पत्रे यांना पत्रकारांच्या मागण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी “पत्रकार संरक्षण समिती” च्या राज्यातील जिल्हाध्यक्ष , पदाधिकारी तसेच पञकार मिञांकडून निवेदनाव्दारे होत आहे.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *