👁 6 Views

स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या ऑनलाईन प्रोग्रामला सुरुवात


Pandharpur Live –

पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल  इंजिनिअरिंग या विभागाकडून दि. २२ जून ते २६ जून २०२० या कालावधीमध्ये ‘डिझाईन थिंकिंग अॅप्रोचेस इन  इंजिनिअरिंग’ या विषयावर विनाशुल्क ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम होणार आहे. संशोधन ही काळाची गरज आहे. संशोधन करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोन हा महत्वाचा असतो. हीच गोष्ट विचारात घेऊन एखाद्या क्षेत्रामध्ये संशोधन कसे केले पाहिजे व त्यासाठी आवश्यक असणारा वैचारिक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

         स्वेरी विविध बौद्धिक उपक्रमासाठी नेहमी प्रोत्साहन देत असते व त्यादृष्टीने स्वेरीचे  संस्थापक सचिव व  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख कार्यरत असतात. कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये अत्यंत अनुभवी मान्यवरांमार्फत अतिशय मौल्यवान मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यशाळेची सुरुवात रमेश आडवी यांच्या ‘इंट्रोडक्शन टू डिझाईन थिंकिंग’ या विषयाने होणार आहे तर दुसऱ्या सत्राची सुरुवात सौ. सुजाता कोडक यांच्या ‘इनोवेशन ए डिझाईन थिंकिंग अॅप्रोच’ या विषयाने होणार आहे. त्यानंतर कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशीच्या  पहिल्या सत्रात डॉ. प्रकाश आपटे हे ‘डेवलपमेंट ऑफ डिझाईन थिंकिंग अॅप्रोच युजिंग कि स्टेप्स’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्राची सुरुवात शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांच्या ‘टूल्स युजड फोर डिझाईन थिंकिंग’ या सादरीकरणाने होणार आहे. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी सुदर्शन नातू हे ‘प्रोडक्ट डिझाइन एक्सपिरीयन्स थिंकिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर दुसऱ्या सत्रात सचिन  वडीखये हे ‘प्रॅक्टिकल डिझाईन थिंकिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी सौ. रचना दर्शन या ‘पॉवर ऑफ डिझाईन थिंकिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या अंतिम दिवशी दीपक कोंडा हे ‘अंडरस्टँडिंग डिफरंट  अस्पेक्टस  ऑफ  आर्किटेक्चरल युजिंग डिझाईन थिंकिंग’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी सहभागी लोकांसाठी प्रश्न मंजुषातसेच प्रत्येक व्याख्यानाकरता अभिप्राय देता येणार आहे. या कार्यशाळेचे उदघाटन रमेश आडवी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेमध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकविद्यार्थी व औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्रातील ५०० जणांनी तर ओरीसातामिळनाडूतेलंगणाआंध्र प्रदेशगोवागुजरातपश्चिम बंगालकर्नाटकपंजाब या आणि संपूर्ण भारत देशातुन तीनशे जणांनी सहभाग नोंदवला आहे. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. चेतन लिमकरप्रा. सुप्रिया लोंढेप्रा.पुजा तरळगट्टीप्रा.सोनाली पाटीलप्रा. प्रशांत भागानगरेप्रा. श्रीकृष्ण गोसावी यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग परिश्रम घेत आहेत.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *