👁 8 Views

पंढरीत उद्या दुपारपासून गुरुवारपर्यंत संचारबंदी आदेश लागू


आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

 

            सोलापूर, दि. 29 : आषाढीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या काही गावांमध्ये उद्या, मंगळवार (दि. 30) दुपारी दोन वाजल्यापासून ते गुरुवारी, दोन जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी म्हणजेच मनाई आदेश घोषित करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. पालखी किंवा पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येण्यास मनाई आदेश लागू केले आहेत.  

            आषाढी वारीसाठी राज्यभरातून नऊ मानाच्या पालख्यांना 20 वारकऱ्यांसह पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनेसंसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरेचिंचोळी भोसेशेगाव दुमालालक्ष्मी टाकळीगोपाळपूरवाखरीकोर्टीगादेगावशिरढोण आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत 144 कलमान्वये आदेश जारी केले आहेत.

आदेश खालील बाबींना लागू होणार नाही*

1.      अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारे खाजगी/सरकारी रूग्णालयेआरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने.

2.      ॲम्ब्युलन्स सेवा आणि सारीआयएलआय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी/कर्मचारी.

3.      जीवनाश्यक सेवेतील आस्थापना

4.    मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक किंवा परवानाधारक व्यक्तीप्रशासनाने परवानगी दिलेल्या पालख्या व सोहळे.

5.     कर्तव्यावर असणारे महसूलपोलीसपाणीपुरवठाअग्निशमकविद्युत पुरवठा विभागातील शासकीय अधिकारी/कर्मचारी.

6.      पोलीस बंदोबस्तासाठी भोजनालयपाणीपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा.

 

     या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईलअसे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *