👁 8 Views

कर्मयोगी इंजीनिअरिंग कॉलेज शेळवे येथे ‘इनोव्हेशन अँड पेटंट’ या कार्यशाळेचे आयोजन



कार्यशाळेसाठी उपस्थित व्याख्याते कु.अंकीता नगरकर व सोबत   कार्यशाळेची रुपरेषा.
Pandharpur Live– 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, शैक्षणिक विकास, संशोधन वृत्तीची वाढ यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार श्रंखला आयोजित करण्यात आल्या आणि या श्रंखला चा फायदा महाराष्ट्रातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी घेतला. 

 वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि याचा फायदा सभोवतालच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होतो आणि महाविद्यालय आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे.  – प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
वेबिनार श्रंखला चे सातत्य कायम ठेवत महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने दिनांक 4/7/2020 रोजी,’इनोव्हेशन  अँड पेटंट’ या विषयावर वेबीनार आयोजित केला.  


या वेबिनारसाठी पुणे येथील  तरुण संशोधिका कु. अंकिता नगरकर यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी वेबिनार सेरीज चे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ एस. पी. पाटील सर यांनी केले पाहुण्यांची ओळख प्रा. उदय कार्वेकर  तसेच कॉलेजची व वेबिनारची माहिती कॉलेजचे उपप्राचार्य जे. एल. मुडेगावकर  यांनी दिली. प्रास्ताविक  वेबिनार सिरीज चे कॉर्डिनेटर मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राहुल पांचाळ यांनी केले.

कु.अंकिता नगरकर यांनी समाजातल्या अडचणी जाणून घेऊन लहान लहान गोष्टीवर संशोधन केले आहे,त्यांनी स्वतः पेटंट फाईल केलेल्या दहा संशोधनाची माहिती सर्वांना दिली.उदा.इनोव्हेटिव्ह स्टेपलर,रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी कार इंडिकेटर,आधुनिक कांदा कापण्याचे मशीन, वाऱ्यावर चालणारा मोबाईल चार्जर, विजेशिवय चालणारी खुर्ची, सुधारित डिश अंटेना ,कॉपर कोटेड व्हेसल इ.त्यांचा संशोधनाचा प्रवास सोळाव्या वर्षी सुरू झाला त्याच वर्षी त्यांना पाहिले पेटंट मिळाले आहे तसेच डॉ. एपी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाले आहे. आतापर्यंत त्यांना एकूण 65 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी सोप्या भाषेत संशोधन म्हणजे काय? पेटंट म्हणजे काय? ते कुठे कसे रजिस्टर करतात? हे समजावून सांगत विद्यार्थ्यांच्या मनातली भीती घालवली तसेच या संदर्भात त्यांना सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. मुलांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची सहजपणे उत्तरे दिली.या कार्यशाळेसाठी 538 विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तसेच इंडस्ट्री मधील लोकांनी  भाग घेतला.

   वेबिनारचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले होते त्यासाठी आयटी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी तंत्रज्ञ म्हणून  योगदान दिले. वेबिनार चे  युट्युब वर लाइव्ह प्रक्षेपण  करण्यात आले. प्रत्येक सहभागी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देण्यात आले. 


महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री वैभव हिंगमीरे याच्या अथक परिश्रमातून या वेबिनार आमचे मार्गदर्शक लाभू शकले. शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया  मधून भविष्यामध्ये ही असे कार्यक्रम आयोजन करण्याचे सुचवण्यात आले आहे. तसेच वेबिनामूळे विचार करण्याच्या दिशा बदलली असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या  सागर चव्हाण  यांनी वेबिनार  चांगला होता तसेच मॅडम नी इनोव्हेटिव्ह आयडिया शेअर केल्या म्हणून सांगितले. एल. बी. एस. कॉलेजचे प्रो. पटवारी यांनी  सेशन चांगला व संशोधनाची माहिती देणारा होता अशी प्रतिक्रिया व्यक्त केली व कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेजला त्यांनी शुभेच्छा देऊन आभार मानले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे पालकाचे आणि विद्यार्थ्यांचे आभार कार्यशाळेचे समन्वयक प्रा एस.एस. गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य जगदीश मुडेगावकर, संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक,  विद्यार्थी उपस्थित होते.
 वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि याचा फायदा सभोवतालच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होतो आणि महाविद्यालय आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे असे प्रतिपादन प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील यांनी केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *