👁 5 Views

स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या संगणक व आय. टी. विभागातर्फे ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

Pandharpur Live– 
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरींग आणि इन्फर्मेशन टेक्नोलॉजी या विभागांमार्फत टेक्नोविंग्ज सोल्युशन मुंबई यांच्या वतीने ‘ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ (एफ.डी.पी.) अंतर्गत २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इनचार्ज प्रा. एम. एम. पवार यांच्या सहकार्याने, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा ‘ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ संपन्न झाला.

 या कार्यशाळेत २०० हुन अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुंबई येथील टेक्नोविंग्ज सोल्युशनचे सॉफ्टवेअर इंजिनिअर अनिरुद्ध गायकवाड यांनी नवीन टेक्नोलॉजी संदर्भात मार्गदर्शन केले. इन्फर्मेशन टेक्नोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. अवधूत भिसे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समन्वयक म्हणून प्रा. सोमनाथ झांबरे, प्रा. भारती देवकर, प्रा. लक्ष्मण देठे व प्रा. ज्योती पवार यांनी काम पाहिले. तसेच दोन्ही विभागाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले. संगणक विभागाचे प्रमुख प्रा. अमेय भातलवंडे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *