👁 8 Views

लॉकडाऊनमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी छळ झाल्याने पंढरीत विवाहितेची आत्महत्या

Pandharpur Live – 


पंढरपूर : लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणण्याबाबत सासरा, सासू आणि पतीकडून  मानसिक छळ होत असल्यामुळे विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे.


याबाबत या मयत महिलेच्या आईने फिर्याद दाखल केली असली तरीही अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. मयत महिलेची आई संगीता राजेंद्र जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद आणि जबाबाप्रमाणे त्यांची मुलगी प्रणाली हिचा विवाह पृथ्वीराज पाटील यांच्याशी लावून दिला होता. जून महिन्यापासून तिला तिचे सासरे महादेव दाजी पाटील, सासू लता महादेव पाटील (सर्व राहणार गुरुदेव नगर, पंढरपूर) यांनी लॉकडाऊनमुळे कामे बंद आहेत. खूप कर्ज झाले आहे. त्यामुळे तुझ्या वडिलांकडून दीड लाख रुपये आण अशी मागणी करत तिला टोचून बोलत होते, तसेच मानसिक त्रास देत होते.


दि. 5 जुलै रोजी सकाळी दहा वाजता मयत मुलीच्या पतीने तिच्या आईला फोन करून ताबडतोब घरी येण्याबाबत कळवले. घरी गेल्यानंतर प्रणाली ही लोखंडी खाटावर हाताच्या मुठी वळलेल्या अवस्थेमध्ये पडलेली दिसली. त्यावेळेस तिच्या कपड्यातून दोन चिठ्ठ्याही निघाल्या. तातडीने मुलीला कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तेथे गेल्यावर तिचा मृत्यू होऊन बराच वेळ झाला आहे असे डॉक्टरांनी सांगितले. म्हणून मुलीची आई संगीता जाधव यांनी सासु लता महादेव पाटील, सासरा महादेव दाजी पाटील, पती पृथ्वीराज महादेव पाटील यांनी दीड लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये या कारणास्तव अपमानास्पद वागून मानसिक छळ केल्याप्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी सासू-सासरे आणि पती विरोधात कलम 498 अ, 306 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे करीत आहेत.

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *