👁 13 Views

अखिल गुरव समाज संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्षपदी महेश शिर्के तर प्रदेश उपाध्यक्षपदी रविंद्रभाऊ गुरव यांची निवड

पंढरपूर- अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. आण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये नगर येथील महेश शिर्के यांची युवा प्रदेशाध्यक्षपदी व गोपाळपूर ता.पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्रभाऊ गुरव यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नुतन प्रदेश उपाध्यक्ष रविंद्रभाऊ गुरव हे पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रीयपणे सहभागी असतात. त्यांनी आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत. याची दखल घेवून त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तसे निवडीचे पत्र त्यांना देण्यात आलेले आहे.

नुतन पदाधिकार्‍यांचे युवा राज्य कार्यकारी अध्यक्ष सचिन प्रविण धारुरकर, अखिल गुरव समाज संघटनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी तसेच गोपाळपुर येथील गुरव समाजाचे जेष्ठ नेते माजी सभापती दिलीपभाऊ गुरव व राजकीय नेते मंडळींनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *