👁 11 Views

पंढरपूर- आज एकुण 24 पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले… सध्या एकुण 57 कोरोबाधितांवर उपचार सुरू!



पंढरपूर शहर व तालुक्यात आजपर्यंत शहर- 60, ग्रामीण-21 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 7 असे एकुण 88 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले होते.  यापैकी शहरातील 16, ग्रामीण मधील 8 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 5 रुग्ण बरे झाले आहेत.


सध्या पंढरपूर शहरातील 42, ग्रामीण मधील 13 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 2 अशा एकुण 57 बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  आजपर्यंत शहरातील दोन कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 


आज एकुण 24 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत  यामध्ये शहरातील 16 जणांचा व ग्रामीण मधील 8 जणांचा समावेश आहे.  आज गजानन महाराज मठात 55 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. अशी माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे.





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *