👁 8 Views

आज पंढरपूर शहरात 12 तर ग्रामीणमध्ये 1 कोरोना पॉझिटीव्ह… एकुण 90 रुणांवर उपचार सुरु!

Pandharpur- आज एकुण 13 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. यापैकी शहरातील 12 जण तर करकंब येथील 1 रुग्ण आहे.  आजपर्यंत शहरात एकुण 94 रुग्ण आढळुन आले. यापैकी दोघांचा मृत्यु झाला, 22 रुग्ण बरे झाले तर 70 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत ग्रामीणमध्ये एकुण 29 रुग्ण  आढळुन आले. यापैकी 11 रुग्ण बरे झाले तर  18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 


आजपर्यंत इतर जिल्हे व तालुक्यातील एकुण 8 रुग्ण आढळुन आले. यापैकी 6 रुग्ण बरे झाले तर  2 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


असे आजपर्यंत एकुण 131 कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आले असुन यापैकी दोघांचा मृत्यु झाला असुन 39 रुग्ण बरे झाले आहेत तर 90 रुग्णांवर  सध्या उपचार सुरु आहेत. आज वाखरी येथील कोविड सेंटर येथून 39 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.


अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *