👁 8 Views

पंढरपूर सिंहगडच्या ऑनलाईन सेमिनारला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद… १२०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन सेमिनार मध्ये सहभाग



पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या वतीने १२ वी नंतर पुढे काय? तसेच व्यवसायिक शैक्षणिक पाञता, शिष्यवृत्ती विषयी शुक्रवार दिनांक १७ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन फेसबुक लाईव्ह आणि युटूब लाईव्ह च्या माध्यमातून सेमिनार आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाईन सेमिनार मध्ये फेसबुक लाईव्ह तसेच युटूब लाईव्ह च्या माध्यमातून १२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन माहिती जाऊन घेतली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


    या ऑनलाईन सेमिनारच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी १२ वी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ऑनलाईन सेमिनार मध्ये सहभागी झाल्याबद्दल स्वागत केले.

    पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी ऑनलाईन सेमिनारच्या सुरवातीला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना पीपीटी द्वारे ऑनलाईन पद्धतीने फेसबुक लाईव्ह व युटूब लाईव्ह च्या माध्यमातून १२ वी सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुढे कोण-कोणते शिक्षण घेऊ शकतात. ते शिक्षण घेण्यासाठी तुम्ही कोण-कोणती कागदपत्रे स्वतः जवळ बाळगली पाहिजे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पाञता, शिक्षणासाठी शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आवश्यक तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे या विषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती प्रथम वर्षं अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम यांनी सोशल मिडिया च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्या घरी राहून फेसबुक लाईव्ह किंवा युटूब लाईव्ह च्या माध्यमातून दिली.

    या सेमिनार मध्ये ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रा. अनिल निकम यांना प्रवेशासाठी येणा-या अडचणी, शैक्षणिक गुणवत्ता या विषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सद्या सर्वञ कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात. या संचार बंदी च्या कालावधीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने  १२ वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी  १२ वी नंतर पुढे काय? या विषयी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिल्याबद्दल विद्यार्थ्यांमधुन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आभार व्यक्त होत आहे. हे सेमिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अमोल नवले, अमोल लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : पंढरपूर सिंहगड मध्ये ऑनलाईन सेमिनार मध्ये बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे तर माहिती देताना प्रा. अनिल निकम 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *