पंढरपूर: प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील प्रगती’ या विषयावर दिनांक १३ जुलै २०२० ते १७ जुलै २०२० या कालावधीत पाच दिवसांचे ऑनलाईन वेबिनार संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील प्रगती’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार मालिका आयोजित करण्यात आली होती. हे वेबिनार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. यामध्ये जवळपास १०० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते.
या वेबिनार मध्ये “विद्युत अभियंतांसाठी सौर क्षेत्रातील संधी”, “आयटी क्षेत्रातील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी करिअरच्या संधी,” औद्योगिक नवनवीन संधी, पी.डब्ल्यू. एम. तंत्र, “इलेक्ट्रिकल जनरेटर नियंत्रणाची मूलभूत माहिती” आदी विषयांवर तज्ञांकडून ऑनलाईन वेबिनार मध्ये विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आणि औद्योगिक व्यक्तींनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे वेबिनार अतिशय महत्वपूर्ण ठरले आहे.
हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. अंजली चांदणे यांनी परिश्रम घेतले.

