तिसंगी (प्रतिनिधी) रंजीत शशिकांत गायकवाड (रा. श्रीनगरी, कोर्टी रोड, फुट रस्ता, मुळ रा. तिसंगी, ता. पंढरपूर) या इंजिनिअरिंगला शिकत असलेल्या 22 वर्षीय तरूणाने स्वतःचे राहत्या घरी ब्लेडने गळा चिरून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडलीय.
तालुका पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे, पोलिसांनी प्रेत ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही सुरू आहे. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदर तरूण गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होता, बीपी, शुगर अशा आजारांनी ग्रस्त असल्याने तो मानसिक तणावाखाली होता. नैराश्यातुन त्याने आपली जीवनयात्रा संपवली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास
घरातले सगळे कामात असताना सर्वांची नजर चुकवून ब्लेडने गळा चिरून घेत त्याने आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येपुर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली असुन “मी स्वतःच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करत आहे. यात घरच्या लोकांचा कोणताही दोष नाही.” असा मजकूर असल्याचे समजते.
सदर मुलाचे आईवडील प्राथमिक शिक्षक आहेत.

