पंढरपूर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही दिलासादायक आहे. आज एकुण 16 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे तर एकुण 25 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आजपर्यंत 282 पाॅझिटीव्ह रूग्ण आढळून आले हैते; यापैकी आजपर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे, 87 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एकुण 191 जणांवर उपचार सुरू आहेत.
अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे.



