👁 5 Views

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच श्रावण महिन्यात बंद झाले कोर्टीच्या शंभुमहादेवाचे दरवाजे! घ्या कोर्टी येथील शंभुमहादेवाचे ऑनलाईन दर्शन

कोर्टी (अमोल गुरव)-  भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर तालुक्यातील कोर्टीच्या शंभुमहादेवाचे मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऐन श्रावण महिन्यात सुध्दा बंद ठेवण्यात आले आहे.  इतिहासात प्रथमच श्रावण महिन्यात हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवावे लागत असल्याची भावना ग्रामस्थांमधुन व्यक्त होत आहे. 
Online Darshan Video 


पंढरपूर तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असणारे कोर्टी येथे शंभू महादेवाचे  हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरामध्ये चैत्र महाशिवरात्र श्रावण महिन्यात भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की,  हे मंदिर पूर्णपणे अखंड दगडाचे बांधलेले आहे. हे मंदिर बाराव्या शतकाच्या अगोदरही बांधलेले आहे असे म्हटले जाते. या मंदिरामध्ये शिवलिंगाच्या सहा पिंडी व एक पार्वतीची मूर्ती आहे. हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधले गेले आहे असेही बोलले जाते.

 या मंदिरामध्ये अखंड दगडाचे 16 खांब आहेत या मंदिराचा उल्लेख पोथी पुराणामध्ये आहे. या गावांमध्ये कोठेही खोदकाम केलं तरी महादेवाच्या पिंडी सापडतात. आधी कोर्टी मग सृष्टी असे समजले जाते. या गावांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त देव असल्यामुळे गावाला कोर्टी या गावाने ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोर्टी येथील शंभू महादेवाचे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
 येथील पूजा-अर्चा करण्याचा मान श्याम गुरु अनिल गुरव या गुरव समाजाकडे आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.  परंतु सध्या पंढरपूर तालुक्यात व ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्गजन्य रोगामुळे  श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सुध्दा भाविक भक्तांसाठी साठी हे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.  साधारण शंभर वर्षापासून पहिल्यांदाच श्रावण महिन्यात मंदिर बंद झाले आहे. असे भाविक भक्तातून बोलले जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *