👁 6 Views

विवेक वर्धिनीमध्ये 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज 3 महिन्यांपासुन सुरु आहे लाईव्ह कोचिंग

पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दररोज लाईव्ह कोचिंग घेण्यात येत आहे. करोना संकटकाळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून श्री. दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया मार्फत हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. 
सदर कोचिंग चे नियोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर व संस्थेचे सचिव अ‍ॅड. वैभव टोमके यांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. हा लाईव्ह कोचींग प्रोग्राम गेल्या तीन महिन्यापासून व्यवस्थित सुरू आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील विद्यार्थी सहभागी होत आहेत.आपला टॉपिक पूर्ण झाल्यानंतर त्यावर टेस्ट घेतली जाते व सर्व विद्यार्थी उत्साहाने यामध्ये सहभागी होतात.

गेल्या 3 महिन्यांपासुन अशा पध्दतीने ‘झूम’ अ‍ॅपद्वारे हे ऑनलाईन शिक्षण सातत्याने सुरु आहे. यामध्ये विद्यार्थी दररोज सकाळी साडेनऊ वाजता झूम मीटिंग लिंक वर क्लिक करतात व झूम मीटिंगद्वारे दररोज तीन लेक्चर्स  घेतले जातात. तसेच नेटवर्कमध्ये काही अडचण आल्यास या लेक्चर चे  व्हिडिओ बनवून ते यूट्यूब चॅनलवर अपलोड केले जातात  त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अथवा नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यास त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी लेक्चर चे व्हिडिओज  युट्युब वर अपलोड केल्यामुळे  विद्यार्थी  लेक्चर्स कधीही पाहू शकतात.

त्याचप्रमाणे इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना व्हाटस अप व यु-ट्युब द्वारे मार्गदर्शन केले जाते. 
याशिवाय दररोज लेक्चर सुरु असताना विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये अ‍ॅपच्या माध्यमातुन सुसंवाद होतो. विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्‍नांची उत्तरे शिक्षक देतात व शंकांचे निरसन करतात. प्रत्येक विषयाची टॉपीकनुसार टेस्ट घेऊन त्याच्या उत्तरांची चर्चा केली जाते. अशी माहिती प्र.प्राचार्य श्री.भुताडे सर यांनी दिली.  या प्रोग्रॅमवर प्र. प्राचार्य भुताडे सर व विभाग प्रमुख मुंडे सर यांचे नियंत्रण आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *