पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
मुंबई – करोनावरील लस उत्पादनाच्या विविध टप्प्यावर असताना श्रीमंत देशांनी विविध कंपन्याकडे पहिल्या 130 कोटी लसीच्या डोसचे अॅडव्हान्स बुकिंग करून टाकले आहे. त्यामुळे लसीसाठीच्या रांगेत गरीब देशांना मागे ताटकळत उभे राहावे लागण्याची शक्यता आहे.
अमेरिका, युरोपातील देश, जपान विविध कंपन्यांकडे अॅडव्हान्स बुकिंग करीत आहेत. 130 कोटी लसीचे बुकिंग अगोदरच करून टाकले आहे. त्याचबरोबर हे देश आणखी 150 कोटी लसीचे बुकिंग करण्यासाठी विविध कंपन्याबरोबर चर्चा करीत आहेत.
श्रीमंत देशातील लोकसंख्या 150 कोटी पेक्षा थोडी कमी आहे सध्या जगाची लोकसंख्या 780 कोटी इतकी आहे.
अशा अवस्थेत गरीब देशावर रांगेत उभे राहण्याची वेळ येणार आहे. प्राप्त माहितीनुसार लसीचा एक डोस पुरेसा होणार नाही. त्यासाठी दोन डोस द्यावे लागणार आहेत. अशा अवस्थेत उत्पादनक्षमता वाढवावी लागणार आहे. तरच कमी वेळात ही लस संपूर्ण जगातील जनतेला उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान सध्या जगातील औषध उत्पादन क्षेत्र बरेच विकसित झाले आहे. जर सर्व कंपन्यांनी समन्वयाने प्रयत्न केला तर कमी कालावधीत जगांना पुरेल एवढी लस उपलब्ध होऊ शकणार आहेत. मात्र याच्या वितरणावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे. अन्यथा लस उपलब्ध असूनही ती लवकर मिळावी म्हणून गोंधळ वाढू शकतो. यासाठी सर्व देशांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे.
आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची
लस मिळविण्यासाठी भाऊगर्दी झाल्यानंतर या लसीचे न्याय वितरण व्हावे यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.आरोग्य संघटनेने 2021 पर्यंत 200 कोटी डोस मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र श्रीमंत देश जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांना मानतील की नाही हे महत्त्वाचे ठरणार आहे.

