👁 11 Views

उपरी येथील अतिक्रमणाच्या विरोधात रिपाईचे उपोषणास प्रारंभ

पंढरपूर प्रतिनिधी –
पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील दलित वस्ती स्मशानभूमीजवळ असलेल्या गायरान जमिनीवर गावातील काही समाजकंटकांनी अतिक्रमण केल्यामुळे दलित समाजाला जिवंतपणी नरक यातना सहन कराव्या लागत आहे याबाबत सन 2013 पासून शासनाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने देऊन याबाबत आजतागायत विचार होत नाही त्यामुळे आरपीआय आठवले गट च्या वतीने व आघाडी प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन उपरी गावचे शाखाप्रमुख दत्ता वाघमारे अनिल सोनवणे आदी ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपरी येथील गट नंबर 447 मधील दोन हेक्टर बहात्तर आर (७ एकर ) हि गायराण शेतजमीन दलित समाज व मुस्लीम समाजाची दफनभूमी असून गावातील काही गाव गुंड समाजकंटक यांनी या जागेवर अतिक्रमण करून गेली वीस वर्ष बागायत शेती करून उत्पादन घेत आहेत वारंवार दुःखद घटनेची समाजातील लोकांना वेठीस धरून त्यांना त्रास व हाल सहन करावे लागत आहे यातून मुक्ती मिळावी म्हणून आज रोजी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *