👁 4 Views

मंगळवेढा : संतापजनक महिलेचा विनयभंग करून मारहाण ; तीघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव शिवारात वैरण काढण्यास गेलेल्या एका तीस वर्षीय विवाहित महिलेला वाईट हेतूने अंगाला हात लावून स्पर्श करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी


भारत धुळा टकले, नंदा पांडुरंग वगरे, पांडुरंग वगरे (रा.धर्मगांव) या तीघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी तथा पिडीत महिला दि. १४ रोजी सकाळी १०.३० वा. गट नं.९/१ मध्ये जनावराकरीता वैरण काढण्याकरीता गेली असता वरील आरोपीने

शेतात नांगरत असल्याचे दिसल्यानंतर आरोपीना त्यास नांगरू नका असे सांगितले. त्यावेळी आरोपीनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.


व आरोपी पांडुरंग वगरे यांनी फिर्यादीच्या अंगाला वाईट हेतूने स्पर्श करून झंपरमध्ये हात घालून झंपर फाडून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीने ही घटना पतीस फोन करून सांगून बोलावून घेतले. त्यावेळी नवऱ्यासही शिवीगाळ करून हे शेत आमचे आहे असे म्हणून दगड घेवून नवऱ्याच्या कपाळावर मारून जखमी केले व आरोपीनी फिर्यादीस खाली पाडून हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तक्रार देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *