Pandharpur Live Online
कालच्या दिवसभरात राज्यात 11,514 कोरोना व्हायरस संक्रमित नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 316 जणांचा मृत्यू झाला. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 वर पोहचली आहे. यापैकी 1,46,305 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत तर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्यांंची संंख्या 3,16,375 इतकी आहे. दुर्दैवाने आजवर 16,792 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
राज्यात मुंंबईत आता हळुहळु कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे, कालच्या दिवसभरात मुंंबईत अवघ्या 910 कोरोना रुग्णांंची वाढ झाली असुन एकुण कोरोना रुग्णसंख्या 1,20,165 वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरात 92,661 रुग्ण बरे झाले आहेत. अशीच सुधारणारी परिस्थिती महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 20 लाखाचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत देशात 62,538 नव्या रुग्णांची वाढ झाली असुन देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,27,075 वर पोहोचली आहे. देशात मृतांची एकूण संख्या 41,585 वर पोहोचली आहे. देशात सद्य घडीला 6,07,384 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 13,78,106 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

