👁 4 Views

कर्मयोगी अभियांत्रिकीमध्ये “उद्योगतेचा ध्यास” विषयावर कार्यशाळा संपन्न


माजी विद्यार्थी-प्रसिद्ध उद्योजक वैभव पाटील यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे मानले आभार.

 प्रचंड मेहनत, स्वत: वरील विश्वास, आणि सयंम हे गुण अंगी बाळगल्यास उद्योग क्षेत्रात हमखास यश मिळते. विद्यार्थ्यानी यशस्वी उद्योजकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपली ध्येयप्राप्ती करावी असे प्रतिपादन तरुण व यशस्वी उद्योजक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे माजी विद्यार्थी वैभव पाटील यांनी केले. 


श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी डे च्या निमित्ताने कर्मयोगी महाविद्यालय व इन्स्टिट्यूशन कौन्सिल चे अंतर्गत दि 11 मे रोजी  “उद्योगतेचा ध्यास” या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. सचिन शिंदे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली.

ऍग्रो रीच बायोटेक पुणे या कंपनी चे मॅनेजिंग डायरेक्टर असलेल्या वैभव पाटील यांनी उद्योग क्षेत्रात प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्वप्रथम महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे आभार मानून कॉलेज विषयी ऋण व्यक्त केले. आपण कॉलेज करत असतानाच उद्योजक व्हायचे अशी जिद्द बाळगली होती. कॉलेज संपल्यानंतर ऍग्रो रीच बायोटेक ही कंपनी पुण्यामध्ये स्थापन केली. कंपनीचे सध्या 70 प्रॉडक्ट बाजारामध्ये आहेत व कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे सात कोटी असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.  उद्योजक होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे तसेच नवीन उद्योगासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच भविष्यात मुलांना उद्योग स्थापने साठी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 


कार्यशाळेविषयी बोलताना कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी वैभवचे  अभिनंदन करत त्यांनी मिळवलेले यश मुलांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्सहित करण्यासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भविष्यामद्धे ही केले जाईल असे ही त्यांनी संगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचा विद्यार्थी चैतन्य पताळे याने केले. 

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. सदरच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *