👁 18 Views

संतापजनक…एचआयव्ही पॉझिटीव्ह लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षाने करून घेतले तोंड काळे! एचआयव्हीग्रस्त मुलीवर केला बलात्कार!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

पुणे – एचआयव्ही पॉझिटीव्ह लोकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षानेच एचआयव्हीग्रस्त मुलीवर बलात्कार करून स्वतःचे तोंड काळे करून घेतल्याची संतापजनक घटना बालाजीनगर येथे घडली आहे .

याप्रकरणी संस्थेच्या अध्यक्षाविरुध्द सहकारनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हमीद सलमानी(45,रा.बालाजीनगर, धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीची लाईफ प्रोसेस हेल्प फाऊंडेशन नावाची संस्था धनकवडीमध्ये आहे. ही संस्था एचआयव्ही पॉझिटीव्ह असलेल्या लोकांसाठी समाजकार्य करते. येथे एका अल्पवयीन मुलीला मार्च महिन्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही मुलगी संस्थेत उपचार घेत असताना आरोपीने तिच्याशी वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले.

याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मदने करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *