👁 12 Views

प्रा. कणसे सरांच्या कर्मयोगी पॅटर्नमुळे डिप्लोमा, इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांची उत्त्तुंग भरारी !


पंढरपूर – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या पॉलिटेक्निकच्या २०२० च्या उन्हाळी परीक्षेत शेळवे – पंढरपूर येथील कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजच्या २३७ विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिलेली होती. त्यापैकी ८८ विद्यार्थ्यांनी  ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले तर ८० टक्के ते ९० टक्के दरम्यान गुण असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ११२ एवढी आहे. तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

गेली सलग तीन वर्षे लागलेल्या उज्ज्वल निकालामुळे कर्मयोगीचा नावलौकिक महाराष्ट्र भर झाला आहे. यामध्ये प्रथम वर्ष कॉम्प्युटर शाखेमधून प्रथम क्रमांक राऊत ऋतुजा (९९%), द्वितीय व्हनमाने रणजीत (९७.१३%), तृतीय खाडे विनायक (९६.८८), सिव्हिल शाखेमधून प्रथम क्रमांक बनसोडे उज्ज्वला (९४.४२%), द्वितीय पठाण साजिद (९२.६३%), तृतीय आमले साक्षी (९२.२०%), मेकॅनिकल शाखेमधून प्रथम क्रमांक बावळे दुर्वा अंकुर(९७.०७%), द्वितीय गुरव शुभम (९६.५३%), तृतीय सातपुते विजय (९६.१३%), इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेमधून प्रथम क्रमांक गायकवाड निकिता (९७.७५%),द्वितीय पवार प्रतीक्षा (९३.२५%), तृतीय केसकर प्रतीक्षा (९२.२५% ), इलेक्ट्रिकल शाखेमधून प्रथम क्रमांक मोरे वैभवी (९६%), द्वितीय तांबवे विशाल (९५.५६%), तृतीय मंगेडकर श्रेया (९५.३८%), ऑटोमोबाइल शाखेमधून प्रथम क्रमांक पाटेकर समीर (९१.८८%), द्वितीय शिंदे महेश (९१.५%), तृतीय आढवळकर ऋषीकेश (९१.१३%) गुण मिळवले.

कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. कणसे. ए. बी, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके, तसेच सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

तसेच या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांनी प्रा. कणसे सरांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *