👁 10 Views

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पंढरपूर तालुक्यातील जैनवाडीत सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

स्वयंपाक नीट करता येत नाही,लग्नात जावयाचा मानपान केला नाही म्हणून सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पुजा महेश लिंगडे (वय-२१, रा.जैनवाडी तालुका पंढरपूर) या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.   सोमवारी सकाळी तिने आत्महत्या केल्याचे घरच्या लोकांना निदर्शनास आले. या बाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पूजा हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी जैनवाडी येथील महेश लिंगडे यांच्याशी झाला होता. तेव्हापासून तिला स्वयंपाक येत नसल्याच्या कारणावरून आणि मान पानावरून त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून पूजा मागील काही दिवसांपासून कासेगाव( ता. पंढरपूर) येथील आई-वडिलांकडे राहत होती. 

पुजा परत सासरी नांदायला जायला तयार नव्हती. मात्र पती महेश यांनी फोनवरून ‘ पुजाला आजच्या आज पाठवा, नाहीतरी परत नांदवणार नाही’ असा निरोप दिल्याने भाऊ चैतन्य, आई व मामा यांनी मुलाबाळांसहीत पुजाला सासरी नेऊन सोडले होते. त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी पुजाला मारहाण झाल्याचा फोन आला होता; परंतु सकाळी बघू असे म्हणत पुज्याची माहेरच्या लोकांनी समजूत काढली होती.दुसर्या दिवशीच १२ वाजता पुजाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्या मंडळींना कळाली.घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *