कोरोनामुळे पंढरपूर येथील एका कर्तव्यदक्ष डॉक्टरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूर येथील डॉ. शितल शहा यांचे हॉस्पिटल शेजारी वास्तव्यास असलेले डॉ. सचिन रमणलाल दोशी (वय 44) यांचे आज पहाटेच्या सुमारास कोरोनामुळे दुःखद निधन झाले.
डॉ. दोशी यांचा कासेगाव (ता. पंढरपूर येथे) ‘सन्मती क्लिनीक’ हा खाजगी दवाखाना आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी ते कोरोना बाधीत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुणे येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. दोशी यांच्या निधनामुळे पंढरीतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असुन एका कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणा-या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.
पंढरपूर लाईव्ह परिवाराकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
पंढरीतील दैनंदिन जनसंपर्कात येणा-या प्रत्येकालाच कोरोना टेस्ट करवून घेणे बंधनकारक करणे अत्यावश्यक!
पंढरीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील विविध भागात फिरणारे फेरीवाले, भाजीवाले, यासह व्यापारी व त्यांचे कर्मचारी, हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचारी, दुकानदार, दुधवाले अशा दैनंदिन जनसंपर्कात येणा-या प्रत्येकाची कोरोना टेस्ट करवून घेणे बंधनकारक करणे काळाची गरज आहे. असे मत अनेक सजग नागरिकांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ शी बोलताना व्यक्त केले. याचा विचार करून प्रशासनाने यादृष्टीने योग्य ती पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

