👁 12 Views

पंढरपूर चे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी सचिन ढोले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने “सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी” पुरस्कार घोषित

पंढरपूर चे कर्तव्यदक्ष व जनप्रिय प्रांताधिकारी म्हणून जनसामान्यात ओळख असलेले उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने “सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी” हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 

भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच महसूल दिन यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सचिन ढोले यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 

प्रांताधिकारी सचिन ढोले गेल्या अडीच वर्षापासून पंढरपूरमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात महसूल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली तसेच पंढरपूरच्या वारीचेही योग्य नियोजन केले.  महापूर तसेच कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात देखील त्यांनी प्रसंगावधान राखून योग्य व चांगले नियोजन केले. तसेच लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेलेले भूसंपादनाची प्रक्रिया. या सर्व बाबींचा विचार करूनच जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी सचिन ढोले हे पंढरपूर ला लाभलेले पहिलेच असे प्रांताधिकारी आहेत की, जे सर्वांनाच सहजासहजी उपलब्ध होतात. सर्वांचे कॉल रिसिव्ह करतात, तात्काळ समोरच्या व्यक्तीचे शंकानिरसन करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंढरपूर तालुक्यातील राबविलेल्या विविध उपाययोजनांचे ‘पंढरपूर पॅटर्न’ म्हणुन महाराष्ट्रभरात कौतुक झाले. 

अल्पकाळाच त्यांनी आपल्या धडाडीच्या आणि अभ्यासपूर्ण  कार्यातुन एक कुशल व कार्यतत्पर लोकप्रिय प्रांताधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. 

त्यांना पुरस्कार घोषित झाल्याचे समजताच पंढरपूर शहर व तालुक्यातील जनसामान्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. पंढरपूर लाईव्ह कडूनही त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा! 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *