दि.१५.०८.२०२० रोजी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री.दिलीप शिवलाल शहा प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, माजी नगरसेवक श्री तुकाराम राऊत आदी मान्यवर उपस्थीत होते.
मान्यवरांच्या आगमनानंतर प्रमुख पाहुणे श्री.दिलीप शहा यांचे हस्ते ध्वजपूजन करुन ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत गाऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली व झेंडागीताने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या काळात सोशल डिस्टंसींगचे सर्व नियम पाळत ७४ वा स्वातंत्र्यदिन प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काही निमंत्रीत पालकांनीही आपली उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री काळे यांनी केले. याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक श्री गावडे, श्री डुणे, श्री सावंत, सौ प्रियांका टीचर, भाग्यश्री टीचर सौ प्रज्ञा टीचर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ – ध्वजपूजन व ध्वजारोहन करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शहा सर व उपस्थित प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके आदी मान्यवर.

