👁 4 Views

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज शास्त्रज्ञ डाॅ. विजय निंबाळकर यांची सदिच्छा भेट


पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयास नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी सरंक्षण मंञालय मुंबईचे शास्त्रज्ञ डाॅ. विजय निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.


    सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या वतीने शास्त्रज्ञ डाॅ. विजय निंबाळकर यांचे अधिष्ठाता डाॅ. चेतन पिसे याच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


   यावेळी बोलताना शास्त्रज्ञ डाॅ. विजय निंबाळकर म्हणाले, सिंहगड संस्थेने अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संस्थेत जागतिक दर्जाच्या अध्यापन सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात. यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील सिंहगड संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे. संस्थेने अल्पावधीत केलेली शैक्षणिक व संशोधन प्रगती हि अतिशय उत्तम असुन भविष्यात अशीच वाटचाल ठेवणे आवश्यक आहे. संशोधन विषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. नवनवीन टेक्नॉलॉजीज बद्दल माहिती देऊन यामध्ये असलेल्या अनेक नोकरीच्या संधी याविषयावर हि माहिती दिली. संशोधन निधी कसा उपलब्ध करावा याबद्दल माहिती दिली. 

   या दरम्यान महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व अधिष्ठाता उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *