पंढरपूरः- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६५०५ ला मान्यता मिळाली असून सोमवार (दि. १० ऑगस्ट २०२०) पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे,कागदपत्रे पडताळणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२० पर्यंत चालणार आहे अशी माहिती प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.
डी. फार्मसी सन २०२०-२१ करीता प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,भरलेले अर्ज स्विकारुन प्रमाणपत्रे, कागदपत्रांची तपासणी,छाननी व नोंदणी आदी प्रक्रिया करण्याकरिता मुंबई येथील मा. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (डी.टी.ई) यांचे अधिकृत केंद्र (एफ.सी. क्र.-६५०५) म्हणून मान्यता दिली आहे. पंढरपूर पंचक्रोशीतील व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन, पालकांचा होणारा संभ्रम, संबंधीत कागदपत्रे जमविताना होणारी अडचण व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा केंद्र सुरु केले असून यंदाचे हे डी. फार्मसीचे १५ वे वर्ष असून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रवेशाकरिता बारावी सायन्स परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रकिया दि. १० ऑगस्ट २०२० पासून ते दि. २५ ऑगस्ट २०२० सायं. ५.०० वाजेपर्यंत चालणार आहे. याचा लाभ बारावी सायन्स मधून उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी घेण्याचे आवाहन केले आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. डी. फार्मसी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी मोबा.क्र ९७६६१५९२९८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी केले आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. फार्मसीच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व प्राचार्य सतीश मांडवे.

