👁 9 Views

‘बेस्ट उपजिल्हाधिकारी’ म्हणून मुुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांचा गौरव!

मुंबई – महसूल विभागात क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी आणि कर्मचारी यांचा महसूल दिनी म्हणजेच एक ऑगस्ट रोजी गौरव सन्मान करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेप्रमाणे सन 2019-2020 च्या वर्षाकरिता जिल्हा मुुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रशासनाअंतर्गत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना बेस्ट उपजिल्हाधिकारी सन 2019-2020 च्या  करिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.

तसेच डिशनल कलेक्टर विवेक गायकवाड यांनाही सन 2019-2020 च्याकरिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले .

जिल्हा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी बोरीकर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *