👁 9 Views

स्वेरीला’ अगदी सुरुवातीला व तदनंतर नेहमीच आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.’ -स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे

 ‘माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना स्वेरीचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संस्थापक विश्वस्त एच.एम. बागल, व बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम.पवार, संस्थेतील  इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण!


पंढरपूर- ‘गोपाळपूरच्या माळरानावर जिथे काहीच नव्हते तिथे अभियांत्रिकी महाविद्यालय काढण्याचे स्वप्न पाहून प्रथम आम्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी स्वप्न पूर्णत्वाला नेण्यासाठी तीन महत्वाच्या कानगोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे ‘शिक्षण संस्था काढणे, ती चालवणे आणि ते ही चांगल्या पद्धतीने चालवणे’ असे सांगून त्यांनी स्थापनेपासून ते आतापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य केलेले आहे. स्वेरीच्या वाटचालीत आदरणीय    सुधाकर पंतांचे सकारात्मक योगदान मोलाचे आहे. स्वेरी च्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिल चे ते सलग १० वर्षे चेअरमन होते. ज्येष्ठ संस्थापक विश्वस्त यांच्याशी त्यांची असलेली जवळीकता आणि स्वेरीच्या विश्वस्त मंडळावर  त्यांचा असलेला विशेष  विश्वास यामुळे ‘स्वेरी’ च्या इतिहासात काही सोनेरी पाने लिहिली गेली आहेत. ज्या ज्या वेळी मी व दादासाहेब काही अडचणी घेऊन त्यांच्याकडे गेलो त्या त्या वेळी त्यांनी अडचणी तर सोडवल्याच परुंतू आमचा  आत्मविश्वास कसा वाढेल हेही पाहिले. अशी मनाने निर्मळ व सकारात्मक दृष्टिकोन असणारी माणसं मिळणे हा एक नशिबाचाच भाग आहे व ते आपणास सुधाकरपंत यांच्या रूपाने मिळाले होते.’ अशा शब्दात स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी भावनेला वाट करून दिली.    
         पंढरपुरचे माजी आमदार आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांचे पुण्यात कोरोना महामारीमुळे निधन झाले. स्वेरी परिवाराच्या वतीने आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आदरणीय कै.सुधाकर परिचारक      यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे  यांनी केले व त्यानंतर दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की ‘आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांचे स्वेरीच्या स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या प्रत्येक यशात मोलाचे योगदान होते. स्वेरीला ते उत्तम मार्गदर्शन करायचे त्यांच्या अकाली जाण्याने स्वेरी परिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे, दु:ख झाले आहे. आदरणीय पंताच्या मार्गदर्शनाने वेगळी प्रेरणा व बळ येत असायचे. त्यामुळे ते स्वेरीचे आधारस्तंभ होते.’ 

छायाचित्र- पंढरपुरचे माजी आमदार आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांना स्वेरीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी स्वेरीचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे सर, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, संस्थेंअंतर्गत इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *