👁 10 Views

पंढरपूर मध्ये जागतिक फोटोग्राफर दिन साध्या पद्धतीने साजरा… दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.

पंढरपूर ता.१९ : आज जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने पंढरपूर फोटोग्राफर व्हिडिओ ग्राफर असोसिएशन संघ पंढरपूर यांनी जागतिक फोटोग्राफर दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा केला.
सुरुवातीस तालुक्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार सुधाकर परिचारक व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजूबापू पाटील तसेच फोटोग्राफर, पत्रकार व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील दिवांगत यांचे निधन झाल्याने शोकसभेचे आयोजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्व फोटोग्राफर यांनी सोशल डिस्टन्स पाळत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन अध्यक्ष सोमनाथ भादुले यांनी केले.
यावेळी उमेश टोमके म्हणाले, सध्या जगात कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून त्याचा भयंकर परिणाम भारतामध्ये दिसून येत आहे यामध्ये लाखो लोकांचे प्राण जात आहेत.हजारोजण मृत्यूशी झुंज देत आहेत अशा परिस्थितीत पंढरपूर मध्ये पंढरपूर फोटोग्राफर संघाचे मार्गदर्शक व संघाला वेळोवेळी मौलीक संदेश देणारे सुधाकर पंत परिचारक व संघाला वेळोवेळी साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजूबापू पाटील यांचे नुकतेच निधन झाल्याने आपण आजचा *जागतिक छायाचित्र दिन हा साध्या पद्धतीने व नियम पाळून साजरा करीत आहे व आजच्या काळात व्यवसायाबरोबरच जोडव्यवसाय सुरु करा व सचोटीने व चिकाटीने आपण आपल्या व्यवसाय चालू ठेवा. हा मौलिक संदेश नेहमी सर्वांना देणारे कै.परिचारकांना खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
यावेळी तालुक्यातील व शहरातील बहुसंख्य फोटोग्राफर उपस्थित होते याप्रसंगी अध्यक्ष सोमनाथ भादुले, उपाध्यक्ष धीरज साळुंखे,उमेश टोमके,विलास साळुंखे, दिनेश शिळ्ळे, हेमंत भाळवणकर,राहुल गोडसे, अशिफ शेख, विलास साळुंखे, नंदकुमार कारंडे, समाधान पवार उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *