👁 3 Views

मंगळवेढा : चोरीच्या तपासात 12 घरफोड्या उघड

 

सोलापूर,: (हिं.स) शहर व ग्रामीण भागात झालेल्या 12 घरफोड्या उघड करुन जवळपास 12 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.


शहरात माहे जानेवारी महिन्यापासून सायंकाळी 6 ते रात्री 8 च्या दरम्यान शिक्षक कॉलनी, मित्रनगर, वनराई कॉलनी,सप्तशृंगीनगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलनी, बनशंकर कॉलनी, तसेच ग्रामीण भागात अचानक भरदिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले. 


सदर ठिकाणातील रहिवासी दवाखान्याला अथवा कार्यक्रमाला बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर चोरटे कुलूपबंद बंगले शोधून त्यांना लक्ष करीत असे. भरदिवसा चोर्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *