👁 7 Views

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कुंडलिक हंसराव शिंदे


पंढरपूर- रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राचार्य म्हणून डॉ. कुंडलिक हंसराव शिंदे हे हजर झालेले आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागामध्ये सहसचिव म्हणून सन 2005 ते 2008 या कालावधीमध्ये काम केलेले आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापन व संशोधन क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे.

               त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कराड, सातारा, कर्जत, श्रीरामपूर, श्रीगोंदा, हडपसर, कोपरगाव व पुसेगाव या महाविद्यालयांमध्ये 37 वर्षे सेवा केली आहे. यापैकी वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीत त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. श्रीरामपूर येथील आर.बी.एन.बी. महाविद्यालयास त्यांच्या मारगदर्शनाखाली नँकमध्ये 3.46 सीजीपीए सह ‘ए’प्लस ग्रेड मिळाली आहे.

               प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांना अर्थशास्त्र विषयामध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून वीस वर्षांचा अनुभव आहे. आजवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली 12 विद्यार्थ्यांना पीएच.डी. व 11 विद्यार्थ्यांना एम.फिल्. पदवी प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर त्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना देखील पीएच.डी.चे मार्गदर्शन केलेले आहे. दहा पेक्षा अधिक संदर्भ ग्रंथांचे त्यांनी लेखन केलेले असून 28 संशोधन पेपर नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समधून प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना एन.सी.सी. ऑफिसर म्हणून पंधरा वर्षाचा अनुभव आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना ‘बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड’ने सन्मानित केले आहे. प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर शिक्षण क्षेत्रातील एक सक्षम व कार्यकुशल अधिकारी प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *